टीम महाराष्ट्र देशा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खेडच्या निर्मला पानसरे यांचे तर उपाध्यक्षपदी भोरचे रणजित शिवतारे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या नावांची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचेच होणार हे निश्चित होते. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने 18 महिला सदस्या इच्छुक होत्या. तर आता काही दिवसांनी इतर विषय समितींच्या सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आरक्षण जाहीर झाल्यापासून अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या महिला सदस्य, त्यांच्या पतीराजांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून पक्ष श्रेष्ठींजवळ आपली बाजू मांडली आहे. त्यामध्ये पानसरे यांना यश आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत मोठी स्पर्धा होती. मावळमधून शोभा कदम, फुरसुंगीमधून अर्चना कामठे, शिरूरमधून मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल, सुजाता पवार, स्वाती पाचुडंकर, खेडमधून निर्मला पानसरे यांच्यात अध्यक्षपदासाठी तीव्र स्पर्धा होती. मात्र अखेर अजित पवार यांनी निर्मला पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
