टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांचे चित्र एडीट करून ते समाज माध्यमांवर टाकणाऱ्या एकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण करण्यात आली असा आरोप भाजपचे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे.
डावखरे यांनी ट्वीट करत ही मोगलाई कि शिवशाही असा सवालही त्यांनी विचारला आहे. ते म्हणाले, ‘ कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा! कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण.मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई’ का `शिवशाही’
कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा!
कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण.मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई' का `शिवशाही'@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @OfficeofUT @PMOIndia @News18lokmat pic.twitter.com/WCCbg2Kus6— Niranjan Davkhare (@niranjandtweets) April 7, 2020
जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर –
यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही उत्तर दिलं आहे, ते म्हणाले,’आपल्या नेत्यां बद्दल अस केले असते तर? पूर्वी तुमच्या नेतृत्वा विषयी बोलले तरी जेल मध्ये टाकले जायचे. त्याचे फेस बुक तपासा मग बोला. विकृति चे समर्थन करता आहत.’
असे म्हणत आव्हाडांनी तो आक्षेपार्ह फोटोही त्यांना पाठवला आहे. तसेच ‘कायदा हातात घेणाऱ्या कुणाला मी पाठिंबा देत नाही. पण तीच व्यक्ती सोशल मीडियाचा वापर राष्ट्रवादी नेत्यांविरूद्ध अश्लिल संदेशांसाठी करत होती. हे विकृत आहे का? तो तुमच्या सर्वांद्वारे संरक्षित आहे का ? त्याच्या सोशल मीडियाच्या गैरवापराची आणखी २०० पुरावे मी ठेवू शकतो’
आपल्या नेत्यां बद्दल अस केले असते तर?
पूर्वी तुमच्या नेतृत्वा विषयी बोलले तरी जेल मध्ये टाकले जायचे
त्याचे फेस बुक तपासा मग बोला
विकृति चे समर्थन करता आहत pic.twitter.com/QznXbAs6RA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 7, 2020
I do not support anybody who takes law in hand but the same person was using his social media for vulgar msgs against rashtravadi leaders
Is this pervert right ?
Is he protected by you all?
I can put 200 more proofs of his misuse of his social media— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 7, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

