🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.
या भेटीगाठींवरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. आता भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत विखारी शब्दांत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ‘संज्या त्या कुत्र्यासारखा आहे जो गाडी बघून भुंकतो, गाडी मागे धावतो पण गाडी थांबल्यानंतर काय करायचं त्याला माहीत नसतं. त्या कुत्र्याला गाडीत बसायचं नसतं तो फक्त टाईम पास करत असतो,’ असा घणाघात निलेश राणे यांनी केलाय.
संज्या त्या कुत्र्यासारखा आहे जो गाडी बघून भुंकतो, गाडी मागे धावतो पण गाडी थांबल्यानंतर काय करायचं त्याला माहीत नसतं. त्या कुत्र्याला गाडीत बसायचं नसतं तो फक्त टाईम पास करत असतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 29, 2021
‘महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे संजय राऊतांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं’
भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं. एकच कोडं, कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’ हे का सिद्ध करावं लागतंय? संजयजी माझं आवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं,’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जर हे नागपूरमध्ये घडले असते, तर मी बुलडोझरसमोर झोपलो असतो’; नितीन राऊतांनी व्यक्त केला संताप
- यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध कायम ! वाचा राज्य सरकारची नियमावली
- पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ – संजय राऊत
- पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा – अजित पवार
- फीसाठी तगादा लावणाऱ्या औरंगाबादेतील शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
