Share

निलेश राणे अडचणीत ! ‘हिजडा’ शब्द प्रयोगावरून तृतीयपंथांनी जळगावात केला गुन्हा दाखल

Published On: 

जळगाव : ट्विटरवरून सतत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समाचार घेणारे भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. एक राजकीय ट्विट करताना हिजडा असा शब्दप्रयोग केल्याने ते अडचणीत आले आहेत. तृतीयपंथी समाजाने जळगावात येथे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही. पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता’, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान निलेश राणे यांच्या वक्तव्याचा वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चांगलाचं समाचार घेतला आहे. गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सुनावले आहे.तसेच माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं. निलेश राणे यांनी केलेले विधान मागे घ्यावे आणि समस्त तृतीयपंथी समाजाची माफी मागावी अशी, मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

धरावीच्या पुनर्विकासासाठी ही सुवर्ण संधी, राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा : आव्हाड

एपीएमसी मार्केटमुळे लोकांचे जीव धोक्यात घालू नका, अन्यथा रस्त्यावर उतरू : गणेश नाईक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!