Share

धारावीच्या पुनर्विकासासाठी ही सुवर्ण संधी, राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा : आव्हाड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा फटका मुंबईला सर्वाधिक बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे धारावी-गोवंडी सारख्या झोपडपट्टीत येत असल्याचे समोर आले आहे. अतिशय दाटीवाटीचा परिसर असल्याने या भागात ठरवून देखील सोशल डीस्टंंन्सींग पाळल जात नाही. मात्र आता धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

त्यात असे लिहिले आहे की, लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुर्नःविकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही. धारावीच्या विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा परिस्थितीत धारावीच्या पुनःविकासाचा निर्णय घेतला तर तो फायद्याचं ठरेल.

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. त्याचप्रमाणे यावेळी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कोरोनामुळे थांबलेल्या आर्थिक उलाढालीला पुन्हा सुरवात होईल, या निर्णयामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवन दान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे तो धारावी पुनर्विकास असेल असं या पत्रात मांडण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!