पुणे : ट्विटरवरून सतत शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे समाचार घेणारे भाजप नेते आणि माजी खा. निलेश राणे हे चांगलेच कचाट्यात सापडले आहेत. एक राजकीय ट्विट करताना हिजडा असा शब्दप्रयोग केल्याने ते अडचणीत आले आहेत. तृतीयपंथी समाजाने या निलेश राणे यांच्या या शब्दप्रयोगावर राग व्यक्त केला आहे. तर निलेश राणे यांनी तोंडाला आळा घालाव अन्यथा योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.
रोहित पवार शेंबडे ! माझ्या आजोबांच्या पत्रावर बोलू नका म्हणून कीर-कीर करतायत : निलेश राणे
सारंग पुणेकर यांनी ट्विट करत निलेश राणे यांना इशारा दिला. ते म्हणाले की, जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल, इतिहास माहीत नसेल तर मी सांगते. पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, तोंडाला आळा घाला, हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असं ठणकावलं आहे.
जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल@meNeeleshNRane @doke_snehal pic.twitter.com/oQCe7KsZLH
— Sarang Punekar (@sarang_punekar) May 19, 2020
दरम्यान सतत खरमरीत शब्दात ट्विटवरून राज्य सरकार आणि शिवसेनेला निलेश राणे यांनी आपला मोर्चा आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्राचा हवाला देत साखर कारखान्यांचे ऑडीट करा, असे ट्विट निलेश राणे यांनी केले होते. यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावरून या ट्विटर वॉरला सुरवात झाली. मात्र ट्विटरवरून उत्तर देताना निलेश राणे यांनी हिजडा असा शब्द प्रयोग केला. मात्र हा शब्दप्रयोग त्यांना चांगलाचं भोवला आहे.
शिवसेनेच्या राजकारणामुळे राज्यात गावागावात मुंबईकरविरुद्ध गावकरी असा वाद पेटला : दरेकर
राज्याने तात्काळ कोरोनाग्रस्त भागात रॅपिड अँटीबॉडी टेस्ट कराव्या,उच्च न्यायालयाचे राज्याला निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

