🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे यांना बाद करण्यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच खेळी खेळली जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. कालच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्याला कोण माघे टाकतोय हे पवार कुटुंबाला सहन होत नाही.असा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करून हे आरोप केले आहेत.
लोकशाहीच मंदिर समजले जाणाऱ्या विधिमंडळात चालत असणाऱ्या दलालीमुळे राज्यातील राजकारणात मोठ वादळ निर्माण झाल आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे गुरुवारी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यापार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी पवार कुटुंबियांना टार्गेट केलं आहे. धनंजय मुंडे यांना बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी हा कट रचला असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
कालच्या प्रकरणा मुळे धनंजय मुंडेनां बाद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळी सुरु झाली आहे. मुंडेंच्या प्रसिध्दीचा फटका अजित पवारांना पडतोय आणी आपल्या कोण माघे टाकतोय हे पवार कुटुंबाला सहन होत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 2, 2018

काय आहे प्रकरण
वसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

