Share

NAWAB MALIK- सत्य परिस्थिती स्वीकारण्यात भाजपला जरा वेळ जाईल, नवाब मलिकांचा टोला

Published On: 

NAWAB MALIK News

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाशिवआघाडीचे सरकार येण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहे. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. महाराष्ट्रात प्रशासन ढिम्म झाले आहे. आम्ही राज्यपालांना आज दुपारी साडेचार वाजता भेटणार आहोत. पंचनामे होत नाहीत, विमा कंपन्या काम करत नाहीत, मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मदत मिळत नाही यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार आहे. भाजपला राज्यातील जनतेने क्लिन बोल्ड केले आहे. मात्र, ते स्वीकारायला तयार नाहीत. गडकरी सांगतात क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकते हे बरोबर आहे. अस देखील नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!