🕒 1 min read
‘टीम महाराष्ट्र देशा:-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सातारचे माजी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षांतरावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली होती . मंत्रिपदाच्या तुकड्यासाठीचं शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची जहरी टीका जयंत पाटील यांनी केली होती. याच टीकेला आत्ता शिवेंद्र राजेंनी चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले,मागील १५ -२० वर्षे मी राष्ट्रवादीत आमदार म्हणून काम केले, त्या काळात पक्षातील नेत्यांना माझी क्वचीतच आठवण यायची. आता मी पक्षातून बाजूला गेल्यावर, त्यांनी माझ्या नावाचा जपच सुरू केलाय असे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले मला मंत्रीपदाचा हव्यास असता तर, मागच्याच निवडणूकीत राष्ट्रवादी पक्ष सोडला असता. मी पक्षाशी कधीही दगाफटका केला नाही, लोकसभेलाही प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. आता माझी निवडणूक आहे, त्यामुळे मी पक्षातून बाजूला झालो आहे. याचा अर्थ मी पदासाठी बाहेर पडलो असा होत नाही आणि ते आमच्या रक्तात नाही. माझे घर हे शब्दाला जागणारे आहे. राष्ट्रवादीत होतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले आता भाजपमध्ये आहे. इथेही प्रामाणिकपणेच काम करणार आहे, असे उत्तर शिवेंद्र राजेंनी दिले.
दरम्यान मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्याला अनुसरुण बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे . भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवालही जयंत पाटलांनी विचारला शिवेंद्रसिंहराजे यांना विचारला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
