Share

शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला वगैरे शब्द मी वापरणार नाही, पण…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांच्या वेळी ज्यांच्याविरोधात मानायुतीने मते मागितली त्यांच्यासोबतच शिवसेने सरकार स्थापन केले. शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर शिवसेनेने राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र भाजपासोबत येण्याऐवजी ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्यांच्याबरोबर जाऊन शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनादेशाचा विश्वासघात केला असा पुनरुच्चार फडणीस यांनी केला. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला वगैरे शब्द मी वापरणार नाही. पण महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात शिवसेनेने केला आहे हे मात्र स्पष्ट आहे,” असं फडणवीस म्हणाले.

त्यानंतर ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीपासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत शिवसेनेने मोदींच्या नावाने मतं मागितली. निवडणुक काळात त्यांच्या नेत्यांपेक्षा जास्त बॅनर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असायचे. निवडणूक प्रचारातील भाषणे ऐका केवळ मोदीजींवर भाषणं करायचे. मोदींच्या नावाने त्यावेळेस मतं मागितली. आता (विधानसभेला) महायुतीच्या नावाने मते मागितली. निवडूण आल्यानंतर त्यांनी ज्यांच्याविरोधात मतं मागितली त्यांच्यासोबत जी युती केलीय हा जनादेशाचा विश्वासघातच आहे,” असा खोचक टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1204262470610632704?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204266504214044672?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!