Share

शाब्बास रे पठ्ठ्या ! भर संसदेतच केले त्याने केले तिला प्रपोज

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : हल्ली तरुण तरुणी आपल प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त करताना दिसतात. अनेक खेळाडू कलाकारांना तर सार्वजनिक ठिकाणी, क्रिकेट, फूटबॉलच्या मैदानात आपलं प्रेम व्यक्त करताना पाहिलं आहे. परंतु एका पठ्ठ्याने तर भर संसदेत चर्चा सत्रातच आपल्या मैत्रिणीला प्रपोज केल्याची घटना समोर आली आहे.

इटलीमध्ये संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान एका खासदारानं आपल्या मैत्रीणीला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. फ्लेवियो डी मुरो असं या खासदाराचं नाव आहे. या घटनेनंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भर सभागृहात खासदाराचा हा प्रेम व्यक्त करण्याचा अंदाजवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

मुरो यांनी संसदेत चर्चासत्र सुरु असतानाच त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. चर्चासत्रादरम्यान अचानक घडलेला हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढंच नाही तर त्यांच्या मैत्रीणीनंही लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर सर्वच खासदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

परंतु अध्यक्ष रॉबर्टो फिको यांनी चर्चासत्रादरम्यान फ्लेवियो डी मुरो यांनी केलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे नक्कीच मी इंप्रेस झालो आहे. परंतु संसदेच्या कामकाजादरम्यान हा प्रकार योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1202083705935798274?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1202094227842371584?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!