टीम महाराष्ट्र देशा :- वाहन चालकास शिस्त लागावी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी १ सप्टेंबर पासून देशभरात वाहतूकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचं पालन न केल्यास सक्तीने दंड वसुलीही प्रशासनाने सुरु केली आहे. तसेच नियम उल्लंघनाचे दंड देखील १० पटीने वाढवण्यात आले आहेत. मात्र या नवीन मोटार वाहतूक कायद्यावरून देशभरात अनेक अफवा उडू लागल्या आहेत.
देशभरात हाफ शर्ट, लुंगी किंवा चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारण्यात येईल, असे बोलले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती केली आहे. गडकरी यांनी ट्विट करून ही विनंती केली आहे.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
गडकरी यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाउंटवरुन करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अफवांपासून सावध रहा..! नवीन मोटार वाहतूक कायद्यात हाफ शर्ट किंवा लुंगी, बनियान परिधान करून वाहन चालवल्यास कोणताही दंड आकारण्याची तरतूद नाही. तसेच वाहनाच्या मळलेल्या काचा, वाहनात अतिरिक्त बल्ब न ठेवणे किंवा चप्पल परिधान करून गाडी चालवण्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्याची तरतूद या नवीन मोटार वाहतूक कायद्यात नसल्याचेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान नवा मोटार वाहन कायदा लागू झाला यानंतर लोकांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू झाली. या चर्चेनंतर काहीही उलट सुलट अफवा व्हायरल झाला. या कायद्याविषयी अनेक गैरसमज लोकांच्या मनात निर्माण झाले. हा कायदा लागू झाल्यापासून नियमभंग करणाऱ्यांकडून जबर दंड वसूल करण्यासही सुरूवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177197251484999680?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177204280295477249?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

