Share

सुरक्षा दलाची भन्नाट कामगिरी,अतिरेक्याला केलं ठार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा दलानं एका अतिरेक्याला ठार केलं. दक्षिण काश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपूर भागात ही घटना घडली. या भागात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती ; त्यानंतर त्या भागात शोध कार्य अजूनही सुरु आहे अशी माहिती सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली आहे.

पश्चिम विभागाचे सैन्यदल प्रमुख लेफ्टनंट जनरल आर पी सिंग यांनी काल जम्मू विभागातील टायगर प्रभागाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. परकीय शक्ती घातपात घडवणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जवानांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. तसच देशाच्या सीमांचं चोख रक्षण करत असल्याबद्दल सिंग यांनी जवानांचं कौतुक करत मनोबलही वाढवलं.

दरम्यान, छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे ‘डीआरजी’ चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला तर एक जवान शहीद झाला.दंतेवाडातील कतेकल्याण पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जंगलात ही चकमक झाली. नक्षलविरोधी मोहिमेचे डीआयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181520898798448643?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181522059257532416?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!