Share

#Corona_Effect : आयपीएलबाबत BCCIची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. याचा परिणाम IPLच्या वेळापत्रकावरही झाला असून BCCIने आयपीएलबाबत निर्णय घेतला आहे.

BCCIचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारन लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलनं आयपीएल 2020 चे सत्र पुढील सूचनेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

”देशातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे आहे. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक, ब्रॉडकास्टर, स्पॉन्सर्स आणि सर्व भागदारक यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला गेला आहे. देशातील परिस्थितीवर बीसीसीआय लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासन यांच्याकडून आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेत आहोत,” असेही शाह यांनी सांगितले.

दरम्यान 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊन वाढला आणि आयपीएलवरील अनिश्चितता अधिक वाढली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!