टीम महाराष्ट्र देशा : कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. राम शिंदे यांनी सभा घेण्याऐवजी मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. राम शिंदे हे भल्या पाहते प्रचाराची सुरुवात करतात. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
राम शिंदे हे इतर नेत्यांप्रमाणे सभा घेणे टाळत रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका घेणे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. त्यांच्या या वेगळ्या पद्धतीने ते थेट मतदारांशी भेटत असल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे ते त्यांनी केलेली विकासकामे थेट वाड्या वस्त्यांवर जाऊन सांगताना व जनतेच्या समस्या समजून घेताना दिसत आहेत.
राम शिंदे हे लढत असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीने पवार घराण्यातले युवा नेते रहित पवार यांना उमेदवारी दिली आहे. रोहित पवारही जोरदार प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे या मतदार संघात राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात होणारा सामना अत्यंत चुरशीचा ठरणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181884010567323649?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181882192571424768?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181879101470040065?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

