Share

महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले ‘हे’ कारण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १५ दिवस उलटून गेले आहेत. तरीही अद्याप राज्यात खातेवाटप झाले नाही, की मंत्रिमंडळ विस्तारदेखील झाला नाही. अशातच जे खातेवाटप झाले आहे ते तात्पुरते आहे. उद्यापासून (ता. १६) राज्यात हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री यांनी खातेवाटपाला उशीर होण्याची कारणे सांगितली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. फडणवीस म्हणाले की, तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं खरं, पण या महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात संवादाचा अभाव आहे. पक्षांमधील विसंवादामुळेच अजूनही कुठलं खातं कोणत्या पक्षाकडे द्यावं? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आता झालेलं खातेवाटप हे तात्पुरतं आहे, असे महाविकास आघाडीमधल्या एका नेत्याने स्पष्ट केलं आहे.

त्याचप्रमाणे फडणवीस म्हणाले की, तात्पुरतं खातेवाटप झालेलं असल्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही आणि राज्यातल्या जनतेने कोणाला प्रश्न विचारायचे? त्या प्रश्नांना उत्तरं कोण देणार? उत्तर दिल्यानंतर ते खातं त्याच मंत्र्याकडे राहणार आहे का? उत्तर दिल्यानंतर ते खातं बदललं गेलं अथवा दुसऱ्या मंत्र्याकडे दिलं गेलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे असणार? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.

तसेच महाविकास आघाडीला नागपूर अधिवेशनाचे गांभीर्य नसल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. नागपूरमध्ये उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन संपल्यानंतरच महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप केलं जाईल. यावरूनच हे सरकार नागपूर अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचे नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1206154748849573888?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206156533471428609?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!