Share

हौसे नवशे गवश्यानां पदांपासून दूर ठेवा, अजित पवारांचा सल्ला

Published On: 

मुंबई : समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकदिवसीय शिबीरात ते बोलत होते . याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘समाजाचं भलं करण्यासाठी पदाचा उपयोग करा. पवार साहेबांना व मला मान खाली घालावी लागेल असे वागू नका असे सांगतानाच आता हौसे नवशे गवशे येतील मात्र त्यांना पदांपासून दूर ठेवा. दोन वर्ष त्यांना काम करु द्या असा आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील टीकास्त्र सोडले. ” मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.

यावेळी पवार म्हणाले, पदे मिळाली ते पक्ष सोडून गेले त्यामध्ये सचिन अहिर, संजय पाटील, चित्रा वाघ, प्रसाद लाड असे सगळे निघून गेले आहेत. मात्र असे कार्यकर्ते शोधा जे सत्ता नसताना आपल्याकडे राहतील. जे कोण चिकटायला आले आहेत, त्यांना दोन वर्ष काही देवू नका. त्याला काम करु द्या,” मुंबापुरी सर्वांची आहे त्यांना ती आपली वाटली पाहिजे असे काम आपल्याला करायचं आहे, असे कार्यकर्त्यांना बजावले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!