🕒 1 min read
नवी दिल्ली : गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून ते आजतागायत आपल्या आयुष्यावर असंख्य निर्बंध आले आहेत. आत्ताशा कुठे नवीन सुरुवात करणार तर पुन्हा एकदा कोरोनाने पूर्वरुप धारण केले. पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अंधाराने आपले जीवन व्यापून टाकले आहे.
काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यामध्ये भारत देखील आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडनं भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल.
New Zealand PM Jacinda Ardern temporarily suspends entry for all travellers from India, including its own citizens, following a high number of positive #COVID19 cases arriving from there. The suspension starts on April 11 and will be in place until April 28: Reuters pic.twitter.com/MCNUdLZTNs
— ANI (@ANI) April 8, 2021
त्यामुळे आता भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल. शुक्रवारपासून देशात IPL च्या चौदाव्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये न्यूझीलंडचेही अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अंबानींचा मुलगा लॉकडाऊनवर संतप्त, ‘नेते लाखोंच्या जमावासोबत सभा घेतात ते कसे चालते?’
- ‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान
- ‘आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केलीय’
- महाराष्ट्र सरकारमुळे बेजबाबदारपणामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला मोठा फटका बसला – हर्षवर्धन
- बायोबबलमुळे परदेशी खेळाडूंची माघार : सौरभ गांगुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

