टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नववर्षाच्या सुरवातीलाचं म्हणजे येत्या बुधवार पासून 1 जानेवारीलाचं बँकांच्या मुख्यालयात दोन नोडल ऑफिसरची नेमणूक करावी असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
या आदेशात असे म्हटले आहे की प्रत्येक बँकेने २ नोडल ऑफिसरची नेमणूक करावी. यातील एक ऑफिसर हा कार्यकालीन कामकाज तर दुसरा अधिकारी आयटी समन्वयक म्हणून काम करेल. त्या अधिकाऱ्याचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी 1 जानेवारी 2020 पर्यंत सरकारकडे द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर जिल्हापातळीवर जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी नोडल ऑफिसर नेमावा असेही यात म्हटलं आहे. त्याशिवाय ज्या खात्यांमधून कर्ज घेण्यात आले आहे त्यावर आधार कार्ड लिंक केलेल आणि आधार लिंक न केलेल्या खात्यांची माहिती ठाकरे सरकारने मागवली आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत ही माहिती पाठवावी असे म्हटलेले आहे.
विशेष म्हणजे आधारशी न जोडलेल्या खात्यांची यादी शाखेत लावा. तसेच गावच्या चावडीवरही आधार न जोडलेल्यांची यादी लावावी असेही सांगितले आहे.सोबतच बँकांनी आपल्या ग्राहकांना फोन करुन खाते आधारशी जोडून घ्यावे असेही यात नमूद केले आहे.
कर्जमाफी योजनेचा अध्यादेश
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये ठाकरे सरकारने चलाखी केल्याचं समोर आलं आहे. दोन लाखांपेक्षा एक रुपयाही अधिकचं थकित कर्ज असेल, तर शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नसल्याचं सरकारच्या अध्यादेशात उघड झालं आहे. अल्पमुदतीच्या कर्जासाठीच ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे.
१ एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 हा कालावधी कर्जमाफीसाठी देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंतच्या 2 लाखांच्या थकित रकमेला कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ हा फक्त अल्पमुदतीच्या कर्जासाठी असल्याचं या तारखांवरुन स्पष्ट होत आहे. शिवाय कर्ज वैयक्तिक असण्याची अटही यात घालण्यात आली आहे.
शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आलं आहे. मागील कर्जमाफीत अशा शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी होती. मात्र नव्या योजनेत दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना सरसकट अपात्र करण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

