Share

मराठा आरक्षण सुनावणीबाबत विनोद पाटील यांचे राज्यपालांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाची सुनावणी मंगळवारी, १९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात माननीय मुख्य न्यायाधीश यांच्याकडे होणार आहे. याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तात्काळ मुख्य सचिवांना आदेशित करावे, अशी विनंती करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विनोद पाटील यांनी दिले. विनोद पाटील हे मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढत आहेत.

राज्यपाल याबाबतीत तात्काळ निर्णय घेतील आणि बाजू मांडतील, अशी अपेक्षा विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान बाजू मांडावी असे नमूद करण्यात आले आहे.

१९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाकडे मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहेत. या सुनावणीवेळी महाराष्ट्राच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात यावी, याबाबत सूचना मुख्य सचिवांना कराव्यात, त्यासोबतच सुनावणीदरम्यान योग्य त्या विधी तज्ञांना महाराष्ट्राच्या वतीने बाजू मांडण्याकरिता उभे करावे अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196006344576229376?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1196011915454976000?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!