Share

सेल्फ आइसोलेशनच्या काळात रवींद्र जडेजा जपतोय आपले छंद, केला व्हिडीओ शेअर

Published On: 

नवी दिल्ली : टीम इंडियाचे खेळाडू आजकाल आपल्या घरी आहेत. लॉकडाउन संपूर्ण 21 दिवस सुरू आहे. दुसरीकडे, आयपीएल संकटात आली आहे. जगातील सर्वात चित्तथरारक टी -20 लीग रद्द केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सगळ्या सुट्टीचा फायदा घेत भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आपला छंद पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

31 वर्षीय रवींद्र जडेजाने आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर  केला आहे. 43–सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तो घोडसवारी करताना दिसत आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे- माय ऑल टाइम फेव्हरेट… त्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे.

रवींद्र जडेजाला घोड्सावारी फार आवडते. त्यासाठी त्याने आपल्या जामनगरच्या फार्म हाऊसवर घोडे पाळले आहेत. इच्छा झाली की जडेजा या जामनगरच्या फार्म हाऊसवर येऊन घोड्सावारीची मजा घेतो. त्याच्या घोड्यांना नावं देखील त्याने दिली आहेत. यामध्ये गंगा, केशर आणि धनराज अशी त्याच्या घोड्यांची नाव आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी रिषभ पंतने देखील आपल्या इंस्टा अकाऊंटवरून पंतग उडवतानाचा फोटो शेअर केला होता. तर शिखर धवननेही आपण घरगुती कामात मदत करून वेळ घालवत असल्याच ट्विट केलं होत. तर मुलांच्या मनोरंजनासाठी काही तरी शिकत आहे, असेही त्याने ट्विट केले होते.

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!