टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तसेच मोदींबरोबर आज मंत्री मंडळातील काही ठरावीक मंत्री देखील शपथ घेणार आहेत. तर मोदींच्या या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची देखील वर्णी लागली आहे. मात्र अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने शिवसेनेच्या काही खासदारांमध्ये नाराजी असल्याच दिसत आहे.
मुंबईतील खासदारांना झुकते माप दिल्या बद्दल शिवसेना खासदारांमध्ये नाराजी आहे.यावरून शिवसेनेच्या एका खासदाराने लोकसभेतील गटनेते पद देखील नाकारले आहे. ग्रामीण भागाला प्रतिनिधीत्व न देता मुंबईतील खासदाराची मंत्री पदासाठी वर्णी लागल्याबद्दल ज्येष्ठ खासदार नाराज आहेत.
दरम्यान मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेकडून मंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती संजय राउत यांनी दिली आहे. ‘शिवसेनेकडून अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलीय, ही माहिती खरी आहे. शिवसेना कोणत्याही खात्याचे सोने करेल. जसं मागे शिवसेनेकडे अवजड उद्योग खात होते’. असं संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

