टीम महाराष्ट्र देशा : मी उभ्या महाराष्ट्रात जातो आणि असं रणकंदन निर्माण करतो, की भाजपला मोठ्या प्रमाणात विजय मिळेल. आणि विरोधकांचा सूपडासाफ होईल. महाराष्ट्र जिंकायला जात आहे. फक्त तुमचा आशीर्वाद द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम नागपूर मतदार संघातून निरोप घेतला. नागपूरमध्ये त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात दोनच सभा पार पडल्या.
राज्यभर प्रचारात व्यस्त असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मतदारसंघात पुरेसा वेळ देता येत नाही. काल त्यांची दुसरी सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ” माझ्या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीच देवेंद्र फडणवीस आहे, मग मला माझ्या मतदारसंघात येण्याची गरज आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित मतदारांना विचारला. तर ”इथली निवडणूक तुम्ही सर्व सांभाळत असताना मी आता प्रचाराला येणार नाही, तुम्हीच माझी निवडणूक लढवा. ” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सभेत बोलताना त्यांनी नागपुरात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश कसा मजबूत आणि सुरक्षित होत आहे, हे ही सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1184718984920236032?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1184719586618265600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

