Share

#Corona Update : राज्यात कोरोनाचे संकट गडद, रुग्णांची संख्या 159 वर

Published On: 

मुंबई : राज्यात एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संपर्क झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.  आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी दिवसभरात मुंबईतील भाभा आणि कस्तुरबा रुग्णालयात 9 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे.  सांगलीमध्ये नवे 12 रुग्ण तर नागपूरमध्ये 5 रुग्ण आढळले. त्यामुळे  आता कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल 159 वर पोहोचली आहे. या वाढत्या  कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातचं राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!