🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आला आहे. त्यामुळे यावर तोडगा म्हणून राज्य सरकारकडून लोकप्रतिनिधींसह वर्ग अ आणि ब सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याचा लोकप्रतिनिधींचा पगार हा 60% कापण्यात येणार आहे. तर वर्ग अ आणि ब सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 50% कापण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ते म्हणाले की, करोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन दिले जाणार आहे. सरकारनं ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान राज्याच्या तिजोरीवर असून राज्य आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यासाठी 25 हजार कोटींच विशेष पॅॅकेज जाहीर कराव अशी मागणी अजित पवारांनी पंतप्रधानांंना पत्र लिहून केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
