🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्तास्थापनेच्या तिढा सुटत नसताना आता राजकीय गोटातील हालचालीं वेगाने होत आहेत. भाजप शिवसेना, राष्ट्रवादीतील नेते सत्तास्थापनेसाठी एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेआधी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दोघांची भेट होणार आहे.
यापूर्वी ३१ ऑक्टोबरला राऊतांनी पवारांची भेट घेतली होती. हि भेट फक्त दिवाळीच्या सुभेचा देण्यासाठी घेतली असून यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याच राऊत यांनी सांगितलं होतं. आता मात्र सत्तास्थापनेचा तिढा सुटात नसल्याने राऊत-पवारांची पुनर्भेटीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
अशातच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना शिवसेनेकडे अनेक पर्याय असल्याचं राऊत म्हणत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी मदत करण्यास सकारात्मक असल्याचीही चर्चा होताना दिसत आहे. अशा सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत पुन्हा शरद पवारांची भेट घेणं भुवया उंचावणारं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1191934557068709889?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191949199501340672?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
