Share

केंद्राने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास नाही का ? : पाटील

Published On: 

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करत आहेत. यावरून त्यांचा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजवर विश्वास नसल्याचं दिसत आहे, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी हा फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, विरोधकांनी संयमाने राज्यातील स्तिथीचा आढावा घेऊन सरकारसोबत या संकट काळात उतरले पाहिजे. मात्र, विरोधक याचेही राजकारण करत  आहेत. वारंवार राज्यपालांना भेटून तक्रारी करण्यापेक्षा विरोधकांनी सरकारशी संवाद ठेवायला हवा. ते जास्त उपयुक्त ठरेल.

‘आमच्याशी बोला, आम्हाला व्यवस्था आणखी सुधारायला सूचना द्या. सतत राज्यपालांना भेटून त्रास देणे योग्य नाही. अशाप्रकारे व्यवस्थेचे खच्चीकरण करणे योग्य नाही, असे पाटील म्हणाले.

तर देशात आर्थिक व्यवस्था संकटात आहे. याकाळात पॅकेज देणार असल्याचे सांगितले जाते. राज्याचा जीएसटीचा परतावा तरी केंद्राने द्यावा. मुंबई आणि पुण्यासारखी शहरे आज ठप्प पडली आहेत. या शहराचा 4500 कोटी रुपयांचा परतावा देखील केंद्राने अद्याप दिलेला नाही. केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या 20 लाख कोटींमध्ये अर्थसंकल्पातील हिस्सा मोठा असल्याने नेमकी वेगळी अशी काय मदत होणार? हे ही अद्याप स्पष्ट व्हायचे आहे, असेही पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

‘बापटांच्या स्टंटबाजीने पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपची फजिती’

#आपुलकी_गृह : धैर्यशील मानेंनी घालून दिला नवा आदर्श, स्वतःचे घर दिले विलगीकरणासाठी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!