Share

Dil Bechara : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘दिल बेचारा’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे. १४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेम कहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.

संजना सांघीची मुख्य भूमिका असून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. जवळपास तीन मिनिटांचा हा ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. येत्या २४ जुलै रोजी हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट उद्योग कल्याण निधि स्थापन करण्याची नाना पटोले यांची मागणी

नवाजुद्दीन सिद्दीकीचे आणखी 2 चित्रपट रिलीजसाठी सज्ज

बंदीमुळे टिकटॉक निर्मात्या कंपनीला बसू शकतो ६ अब्ज डॉलरचा फटका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!