Share

निलेश राणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे राज्यभरात सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्यात सध्या ६० हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईतही काही करोनाचे काही नवीन रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईसह महत्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत नवीन चिंता बोलून दाखवली.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यशासन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. राज्यातील नागरिकांना कोरोना संबधी माहिती असावी, जनजागृती व्हावी यासाठी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री आवश्यक त्या सूचना देत आहेत. मात्र तरीही माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. गर्दी कमी झाली नाही तर रेल्वे बंद कराव्या लागतील, अशा सक्त इशाराच आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” साहेब आपण आणि मुख्यमंत्री कसली वाट बघत आहात??? हे सरकार रोज कोरोना रुग्ण किती वाढतायत ह्याची माहिती देण्यासाठीच आहे काय? विचार करण्यात आणि बोलण्यात वेळ जितका घालवाल तितका त्रास लोकांना भोगावा लागेल.” तसेच महाराष्ट्रात कशाचा कशावर अंकुश व नियंत्रण नाही. सकाळी पत्रकार परिषद घ्यायची की काम संपलं मुख्यमंत्र्यांचं. काल परवा पर्यंत मुंबईत काेरोना रुग्ण एअरपोर्ट वरून घरी (बोरिविली) गेलेच कसे? Sanitizer व mask चा काळा बाजार जोरात आहे. धाडशी निर्णय घेणारा माणूस अर्धवट निर्णय घेत नाही.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. एकीकडे जनतेला जागरूक करण्याचे आवाहन सरकारपुढे असताना निलेश राणे मात्र सरकारवर टीका करण्यात मग्न आहेत.

दरम्यान, काल शिवसेननेचे नेते संजय राऊत हेदेखील विरोधकांवर चांगलेच भडकले होते. अशा संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लाऊन लढण्याची गरज आहे. एवढा शहाणपणा जर विरोधी पक्षाकडे नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही.आज महाराष्ट्राने एकसंघ राहून काम करण गरजेचं आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाशी युद्ध लढताय , सर्वांना सोबत घेऊन ते अक्ख्या देशात पहिल्यांदा घडतं आहे. आम्ही स्वतः कोरोना विरुद्ध या लढ्यात देशात नरेंद्र मोदींच नेतृत्व मान्य करतो. सगळं देश त्यांच्या सोबत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!