🕒 1 min read
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ल्याच्या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने पाठिंबा दर्शवला आहे. यावरुन तिला अनेकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.
आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दीपिकावर शरसंधान साधले आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्यांसोबत जाण्याचा दीपिकाला अधिकार आहे, अशा शब्दांत इराणी यांनी खोचक टोला लगावला आहे. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बँगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्मृती म्हणाल्या की, जे लोक आपल्या सैनिकांच्या मृत्यूवर आनंद साजरा करतात, दीपिका त्यांच्या बाजूने उभी होती. दीपिकाने आपली राजकीय आवड आणि विचारधारा 2011 मध्ये जाहिर केली होती, जेव्हा तिने काँग्रेसचे समर्थन केले होते. मला तिच्या राजकीय विचारधारेबद्दल जाणून घ्यायचे आहे. जे मुलींना मारतात, त्यांच्यासोबत उभी राहिल्याने मी तिचा विरोध करत आहे. हीच तिचे स्वातंत्र्य आहे का? भारत तुझे तुकडे होणार, म्हणनाऱ्यासोबत उभे राहणे बरोबर आहे का? असे मत इराणी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून छपाकला करमुक्त करण्याची भूमिका मांडली. ‘स्त्रियांचे शोषण आणि अत्याचार यामध्ये देशात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. #Chhapaak चित्रपटामध्ये ॲसिड हल्ल्यामधून बचावलेली तरूणी आणि तीचा समाजाशी संघर्ष याचे कथानक करण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
