Share

‘पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही’; फडणवीसांचा ठाकरेंना उपरोधिक टोला

Published On: 

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा कोल्हापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज(दि. ३० जुलै) रोजी ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शिरोळ तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर शहरातील शाहूपुरी भागातील पाहणी केली. यानंतर सर्व अधिकारी, आमदार, खासदार, जिल्ह्यातील मंत्री यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री ठाकरेंनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पूर संरक्षक भिंतीबाबत खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. ‘‘मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही,’ असं भाष्य मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं आहे.

तर, कोल्हापूर दौऱ्यावरच असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उपरोधिक टोला लगावलाय. ‘सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. अर्थात शासनाने काही सांगितलं असेल. किंवा मुख्यमंत्र्यांनी काही अभ्यास केला असेल. पण पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल,’ असं फडणवीस म्हणाले.

यासोबतच, ‘पूर संरक्षक भिंत बांधणं ही अनेक उपाययोजनांपैकी एक असू शकते. ती विविक्षित भागात होऊ शकते. ती सरसकट बांधता येत नाही. माझं जे छोटं ज्ञान आहे, त्यानुसार सरसकट भिंत बांधणं योग्य होणार नाही. त्यावर सरकार अभ्यास करेल,’ असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!