Share

पशुवैद्यकीय रुग्णालयाची नवीन इमारत तयार, पण जनावरांना डॉक्टरांची प्रतिक्षा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बाजारसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने जिल्हा परिषदे कडून जवळपास ३० लाख रूपये खर्च करून नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात हे काम रेंगाळले होते. मात्र, आता या इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील ‘त्या’ पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. मात्र, येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालक तथा शैतकरी हैराण झाले आहेत. याठिकाणी तातडीने पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्‍ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.

बाजारसावंगीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकरी आपली जनावरे तपासणी व उपचारासाठी या रुग्णालयात आणतात. परंतु, येथील एका डॉक्टरची दुसरीकडे बदली झाली. तर एका सहाय्यक डॉक्टराची सेवा संपल्याने ते सेवानिवृत्त झाले. चार-पाच महिन्यांपासून पशुवैद्यकिय  वार्‍यावर असून खुलताबाद येथील पंचायत समितीच्या एक पशुवैद्यकीय अधिकारी यांची तात्पुरती नियुक्ती असल्याने ते कधी येतात तर कधी येत नाही.

परिसरातील शेतकरी तथा पशुपालक आपले जनावरे तपासणीसह उपचारसाठी दवाखान्यात घेवून येतात. मात्र त्यांना सेवा मिळत नसल्याने ते कमालीचे हैराण झाले आहेत. या रूग्णालयात पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्‍त करण्या संदर्भात अनेकदा मागणी करण्यात आली. याबाबत निवेदने देण्यात आली. वरिष्ठांनी याची दखल घेवून तातडीने बाजार सावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दोन डॉक्टर तातडीने नियुक्‍त करावीत, अशी मागणी पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!