Share

‘ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची चिंता करा; युती-आघाड्यांची चिंता करू नका’

Published On: 

मुंबई : काल शिवसेनेच्या राज्यभरातील सर्व जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक शिवसेना भवनात पार पडली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवरून या बैठकीला मोठं महत्व प्राप्त झालं होतं. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तर, शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या उपस्थितीत ही संघटनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन करताना तुम्ही आघाडी किंवा युती होणार का.? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड 19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं. अशीच चांगली कामं पुढेही करत रहा, अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या या बैठकीवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.

‘ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची चिंता करा. शेतकऱ्यांची चिंता करा. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकाची चिंता करा. तुम्ही मुख्यमंत्री आहात. युती-आघाड्यांची चिंता करु नका. ते जनता बघेल,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे. यासोबतच, ‘मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत,’ अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना काय आदेश ?

‘तुम्ही आघाडी किंवा युती होणार का.? याची चिंता करू नका. तुम्ही फक्तं जनतेची कामं करा. कोविड 19 संसर्ग काळात तुम्ही चांगलं काम केलं. अशीच चांगली कामं पुढेही करत रहा. शाखा प्रमुखांनी प्रत्येक गाव कोरोनामुक्तं करा. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जनतेसाठी कामं करा. आता आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना तुम्ही शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी, जनतेमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत. राज्यभर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नं करा, मी तुमच्या पाठीशी आहे,’ असं भाष्य करत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना बळ दिलं असून सरकारचे विकासात्मक कामं जनतेपर्यंत पोहोचवा असे आदेश देखील दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!