टीम महाराष्ट्र देशा : सोशल मिडियाच्या या जमान्यात कोण काय करेल हे सांगता येत नाही.याचाच प्रत्यय आला तो देवेंद्र फडणवीस यांच्या एका चाहत्याचा. आपल्याकडे एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटो किंवा सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकण्याचा क्रेज सध्या तरुणांमध्ये पाहायला मिळतोय. मग त्यासाठी त्यांची धडपड पाहण्यासारखी असते.
असाच एका कार्यकर्त्याचा टिक – टॉक व्हिडिओ व्हायरल झाला असून,त्या कार्यकर्त्याने फक्त १७ सेकंदाच्या या व्हिडीओ साठी चाळीसगाव ते मुंबई असा जवळपास ४०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. सध्या मुंबईत विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने सर्वच पक्षाचे आमदार विधानसभा आणि विधानपरिषदेत उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते यावेळी आपली कामे घेऊन त्यांना भेटायला येत असतात. अशावेळी ही भेट स्मरणात राहावी आणि नेत्यासोबतच्या भेटीचा फोटो सोशल मिडियावर टाकण्यासाठी कार्यकर्ते फोटो, व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्याची संधी सोडत नाही.
दिपक खंडाळे नावाच्या एका व्यक्तीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा असाच एक टिक – टॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खंडाळे हे चाळीसगाव जिल्ह्यातील उंबरखेड येथील राहणारे आहे. फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचासोबत टिक – टॉक व्हिडिओ बनवण्याची अनेक दिवसांपासूनची त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा शुक्रवारी पूर्ण झाली.सोशल मिडीयावर या व्हिडीओने प्रचंड चर्चा आणि वाह वा ! मिळवली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
