Share

मोदींच्या हस्ते आज आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

Published On: 

नवी दिल्ली: उत्तरप्रदेश हे पाच आंतरराष्ट्रीय विमातळ असलेले देशातील पहिले राज्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (२५ नोव्हें) रोजी दुपारी 1 वाजता उत्तर भूमीपूजन करणार आहेत.

हे विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि त्याच्या बांधकामानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दबावही कमी होईल. जेवार विमानतळ हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील औद्योगिक उपक्रम आणि सेवा क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनेल.

हे नवीन विमानतळ यूपीच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळाच्या पायाभरणीचा पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होणार आहे.

पहिला टप्पा 10,050 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे. 6200 हेक्टरमध्ये हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. पहिल्या टप्प्यात 1334 हेक्टरमध्ये दोन धावपट्टी बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1.2 कोटी प्रवासी प्रवास करतील. विमानतळावर मालवाहतुकीच्या सुविधेशिवाय एमआरओ यंत्रणाही असणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक क्षमता 1.2 कोटी प्रवासी असेल.

हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल, असा योगी सरकारचा दावा आहे. विशेष म्हणजे विमानतळाला प्रस्तावित दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल्वेने जोडण्याची योजना आहे, ज्यामुळे दिल्ली आणि विमानतळादरम्यानचा प्रवासाचा वेळ 21 मिनिटांपर्यंत कमी होईल. एवढेच नाही तर जवळपासचे सर्व प्रमुख मार्ग आणि महामार्ग जसे की यमुना एक्सप्रेसवे, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि इतर देखील विमानतळाशी जोडले जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!