Share

दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवनला डच्चू आणि श्रेयश अय्यरला?

Published On: 

मुंबई : आयपीएल 2022 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी देण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ने त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी अंतिम केली आहे. गेल्या दोन मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनला दिल्ली संघ कायम ठेवणार नाही. पृथ्वी शॉ, अक्षर पटेल आणि एनरिच नॉटेजे (Prithvi Shaw, Axar Patel, Anrich Nortje )हे चार खेळाडू संघाने कायम ठेवले आहेत.

तसेच ऋषभ पंत (rishabh pant) हे. आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आसंघाने श्रेयस अय्यर, अश्विन, शिखर धवन, कागिसो रबाडा यांना कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स शिखर धवनला कायम का ठेवत नाही?

शिखर धवन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात आक्रमक आणि यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. तो आयपीएल 2020 आणि 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

एवढा उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही डीसी व्यवस्थापनाने धवनला कायम न ठेवण्याचा निर्णय का घेतला? डीसी व्यवस्थापनाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वय आणि घसरलेला स्ट्राइक रेट ही कारणे धवनच्या विरोधात गेली असून त्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!