मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील केला. त्यानंतर यावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाष्य केलं. त्यानंतर मिलिंद नार्वेकर कुठे गायब आहेत?, असा सवालही विचारण्यात येत होता. मात्र आता गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मिलिंद नार्वेकर असं काही करणार नाहीत असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जातील असा जे दावा करत आहेत त्यांनी तसे पुरावे द्यावेत असा टोला नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना लागवला.
अफवा पसरवणं काही योग्य नाही-
“काही वेळा एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लूही त्याला लाथ मारल्यानंतर इथे-तिथे फिरून लोकांना डिस्टर्ब करत असत,अशा कुठल्यातरी गोष्टी होत असतात. त्यामुळे असा दावा करणाऱ्यांनी नक्की सांगावं , मुदत द्यावी कि मिलिंद नार्वेकर कधी शिंदे गटात जातील” असंही नीलम गोऱ्हे यावेळी बोलताना म्हणाल्या. उगाचच अशा प्रकारच्या अफवा पसरवणं काही योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी दिली.
किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया-
दरम्यान, मिलिंद नार्वेकरांच्या या चर्चांबद्दल किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
काल रात्रीच मिलिंद नार्वेकर यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला असल्यानं ते शिंदे गटात जाणार या अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला सोडून शिंदे गटात जाणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Rahul Gandhi । राहुल गांधींचा पवार पॅटर्न, कर्नाटकात भर पावसात सभा गाजवली, भारत जोडो यात्रेतील Video
Raosaheb Danave | ‘भाजपशी युती नको’, म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर दानवेंचा हल्ला
IND | पहिले देश नंतर मी, विराटच्या निस्वार्थपणाचा पाहा VIDEO
Girish mahajan | एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

