मुंबई – केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका देत राष्ट्रवादीत प्रेवश केलेल्या जेष्ठ नेते पीसी चाको यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली असून पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल यांनी तसे पत्र दिले आहे.
दरम्यान मास्टर पितांबर हे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून कायम राहतील असेही खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर केले आहे. केरळ राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी कठोर परिश्रम घ्याल असे सांगतानाच पी. सी. चाको यांना यशस्वी कालावधीसाठी प्रफुल पटेल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Hearty Congratulations to Shri P. C. Chacko ji on being appointed as the State President of Kerala @NCPspeaks. I am sure you will work hard for the development of our party in the state. Best wishes for a successful tenure.@PawarSpeaks @NCPspeaks @PCChackoOffice #Appointment pic.twitter.com/9Jj5bWav2l
— Praful Patel (@praful_patel) May 19, 2021
पीसी चाको कोण आहेत?
युवक काँग्रेसच्या माध्यमातून चाको यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. चाको हे तब्बल चार वेळा खासदार राहिलेले आहेत. १९६८ मध्ये त्यांची केरळ विद्यार्थी युनियनच्या सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर १९७०मध्ये त्यांची केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. १९८० मध्ये चाको केरळ विधानसभेत पोहोचले होते त्यानंतर त्यांनी मंत्रिपद देखील सांभाळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आवरा यांना ! भाजप नेता कोरोनाला घालवण्यासाठी यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरतोय…
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल जनतेच्या मनात काय आहे’
- अखेर प्रतिक्षा संपली! फॅमिली मॅन २ चा ट्रेलर प्रदर्शित ४ जुनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १५७ जणांवर गुन्हे दाखल
- सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे कोविडविरोधी लढ्याला मोठी ताकद मिळेल – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

