Share

विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठीच्या संख्याबळाबाबत राष्ट्रवादीचा मोठा दावा

Published On: 

मुंबई : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीच अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. आता पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलं असून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

संविधानिक बाबीनुसार अध्यक्षपदाची निवड तात्काळ करणे गरजेचे असते, मात्र या सरकारने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून अध्यक्षपद अद्यापही रिक्त ठेवल्याची टीका भाजपने केली होती. तर, या पावसाळी अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल असं महाविकास आघाडीतील काही नेते बोलत आहेत. अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं. त्यामुळेच महाविकास आघडी सावध भूमिका घेत असल्याच दिसून येत आहे.

दरम्यान, अध्यक्षांची निवड ही या अधिवेशनात होण्याची शक्यता असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच, अधिक संख्याबळाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराची निवड होईल, असा दावा देखील मलिक यांनी केला आहे. ‘आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल परंतु, आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू,’ असा विश्वास मलिक यांनी केला आहे.

या अधिवेशनातच अध्यक्षांची निवड होणार ?

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सूचवलं आहे. निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांत एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू आहे, असं देखील मलिक म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!