Share

मोदींचा सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय देशहिताचा – नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण येत्या रविवारपासून समाज माध्यम अर्थात सोशल मिडिया वरून आपले सर्व अकाऊंट वापरणं सोडून देण्याबद्दल विचार करत असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात सोशल मिडीयाचा मोठा वाट आहे असा सर्वच विश्लेषकांनी मान्य केलं आहे. परंतु आता नरेंद्र मोदी हेच मध्यम सोडणार अशी माहिती त्यांनी स्वताच जाहीर केल्याने अनेक चर्चांना उधान आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मलिक यांनी ट्विट करून मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘काल मोदी यांनी रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. इतर काही नेतेही सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहेत. जर साऱ्या भक्तांनी (मोदी समर्थक) सोशल मीडिया सोडला तर देशात शांतता येईल. मोदीजींचा निर्णय देशाच्या हिताचा असेल. मोदीजींनी निर्णय घ्यावा, आम्ही त्यांचं स्वागत करतो,” असं ट्विट मलिक यांनी केलं आहे. विशेष म्हणजे #ModiQuitsSocialMedia असा हॅशटॅगही वापरला आहे.

दरम्यान, मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये आपण फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम आणि यु ट्यूब ही सर्व माध्यमे वापरणं बंद करण्याचा विचार करत असल्याच म्हटलं आहे. याबाबत आपण रविवारी कळवू असही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहतात,’या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर माझे सोशल मीडिया अकाउंट्स सोडून देण्याचा विचार आहे. आपण सर्वांशी संपर्क राहिलं.’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!