🕒 1 min read
मुंबई: जागतिक बाजारात भारतीय रुपयाची ७८.१४ रुपये इतकी सर्वाधिक घसरण नोंद करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचा दावा सुरुवातीपासूनच मोदी सरकारने केला होता. मात्र या घसरणीमुळे राष्ट्रवादीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसचा दाखला दिला आहे.
२००९ साली देखील अमेरिकेत आर्थिक मंदी आली होती, ज्याचे पडसाद जगभरात पाहायला मिळाले. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारताला त्याची अधिकची झळ पोहोचली नव्हती. ५६ इंच छातीचा दाखला देत बसण्यापेक्षा डॉ. मनमोहन सिंह यांनी समस्येला समजून घेत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून विधायक निर्णय घेतले होते. असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
२००९ साली देखील अमेरिकेत आर्थिक मंदी आली होती, ज्याचे पडसाद जगभरात पाहायला मिळाले. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे भारताला त्याची अधिकची झळ पोहोचली नव्हती.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 13, 2022
मात्र आज राज्यसभेपासून ते राष्ट्रपती आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या एकेक जागेची निवडणूक लढविण्यात भाजप आणि त्यांचे म्होरके व्यस्त असलेले दिसतात. त्यामुळेच त्यांच्याकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे कोणतेही विधायक निर्णय होताना दिसत नाहीयेत. अशी टीकाही राष्ट्रवादीने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना” ; चित्रा वाघांचा राऊतांना टोला
- अभिनेत्री ईशा गुप्ता फिगर परफेक्ट ठेवण्यासाठी जिममध्ये तासन्तास घाम गाळते! पहा VIDEO
- “काँग्रेसचा एक उमेदवार मागे घेण्यात यावा अन्यथा..” ; गिरीश महाजनांचा सल्ला
- IND vs SA : भारतासाठी मालिकेत पुनरागमन करणे अतिशय कठीण, ‘या’ माजी खेळाडूंचं मोठं वक्तव्य!
- इंग्रजांचे जसे राज्य होते त्याप्रमाणे देशात भाजपची हुकूमशाही सुरू – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
