Share

‘अहंकाराच्या जोरावर महाराष्ट्र काबिज करण्याची खेळी दिल्लीश्वरांनी आखली, मात्र…’; जयंत पाटलांची कार्यकर्त्यांना उद्देशून पोस्ट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचे दोन वर्ष पूर्ण केले. याकाळात त्यांच्या पक्षाची विधानसभेत ताकद वाढली आहे तसेच राज्यात कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या साथीने सत्तेतही आला आहे.

जयंत पाटील यांनी आज फेसबुकवर कार्यकर्त्यांना मागदर्शन आणि धन्यवाद देणारी पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी कार्यकर्त्यांच कौतुक केलं आहे तसेच विरोधी पक्ष भाजपवर टीकाही केली आहे.

जयंत पाटील यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट –

नमस्कार,

हिंदीतील एका प्रसिद्ध शायरने म्हटलं आहे ‘सफलता एक दिन में नहीं मिलती, मगर ठान लो तो एक दिन जरूर मिलती है’ आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेब यांचा आशीर्वाद तसेच मार्गदर्शनाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज मी माझ्या प्रदेशाध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण करत आहे. या दोन वर्षाच्या काळात आपण दिलेले सहकार्य, माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबाबत मी आपले आभार व्यक्त करतो.

आज महाराष्ट्रावर किंबहूना देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या जिद्दीने या संकटाला सामोरे जात आहे. एखाद्या कुटुंबांवर संकट कोसळलं की त्या कुटुंबातील प्रत्येक माणूस कुटुंबाला सावरण्यासाठी मिळेल ती गोष्ट करत असतो. महाराष्ट्र हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुटुंब आहे हा विचार डोक्यात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी सेवादलाचे काम उल्लेखनीय आहे. ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, इतर सेल, खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सोशल मीडिया समन्वयक, बुथचा प्रत्येक कार्यकर्ता ग्राऊंडवर जाऊन काम करत आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने अनेक कुटुंबांना आधार दिला आहे. कोरोना विषाणु विरुद्धच्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. या संकटाशी दोन हात करताना, ग्राऊंडवर काम करताना आपल्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती असतानाही तुम्ही न डगमगता काम करत आहात.

कोरोनाच्या या संकटाच्या काळात मी जिल्हाध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, महिला पदाधिकारी, युवक पदाधिकारी,डॉक्टर सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी व्हिडीओ व आॅडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सातत्याने संपर्कात आहे. त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या सुचनांचा पाठपुरावा केला तसेच त्या सुचनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला तात्काळ आदेशही दिले. विशेषतः राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी लोकांच्या मदतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहेत. हा महाराष्ट्र तुमच्या कामाची नोंद घेईल याची मला खात्री आहे.

मागच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नव्हता, कर्जमाफी दिली तीही फसवी, जीएसटी, नोटाबंदी यामुळे सामान्यांसह व्यापाऱ्यांचेही कंबरडे मोडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारीमुळे तरुण वर्ग नाराज होता. तरी जाहिराती आणि निवडक माध्यमांना हाताशी धरून महाराष्ट्रातील जनतेसमोर फडणवीस सरकारने फसव्या विकासाचा बागुलबुवा तयार केला होता. संघर्षयात्रा, हल्लाबोल पदयात्रा, परिवर्तन यात्रा, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या फसव्या सरकारचा भांडाफोड केला. पश्चिम महाराष्ट्र जेव्हा पुराच्या विळख्यात सापडला होता, तेव्हाही फडणवीस सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले. संपूर्ण राज्यात फडणवीस सरकारविरोधी वातावरण असताना सोशल मीडिया व काही माध्यमांना हाताशी धरून भाजपसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना हे पक्ष टिकणारच नाही असे सतत बिंबवले गेले. आपल्या अहंकाराच्या जोरावर महाराष्ट्र काबिज करण्याची खेळी दिल्लीश्वरांनी आखली, मात्र महाराष्ट्र न कधी दिल्लीच्या तख्तासमोर झुकला न कधी झुकणार ! हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले व भाजपचा अहंकार चक्काचूर करून टाकला. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकांच्या मनातील सरकार अस्तित्वात आले.

माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना मला राज्यभर संघटनात्मक बांधणीसाठी दौरे करावे लागत असत. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्यांने निवडणुकीची चांगल्याप्रकारे जबाबदारी सांभाळली.

माझ्या सहकाऱ्यांनी, ही सत्ता आपल्याला जनतेने दिली आहे तेव्हा या सत्तेचा उपयोग आपण जनतेच्या हितासाठी करायला हवा. आदरणीय पवार साहेब म्हणतात त्यापद्धतीने २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या धोरणावर आपण काम करायला हवे. शासनाचा प्रत्येक निर्णय, शासनाची प्रत्येक योजना, शासनाच्या सवलती राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला हव्यात, याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक सदस्याने घ्यावी. आपण ती घ्यालही याची मला खात्री आहे. याच कामाच्या जोरावर आपण राज्यातील प्रत्येक माणूस आपल्या राष्ट्रवादी कुटुंबाशी, आदरणीय पवार साहेबांच्या विचारांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा.

अपनी किस्मत खुद बनाओ ,

न डरो किसी से ,न सर झुकाओ ,

शर्माना छोडो और सर उठाओ ,

आगे कदम बढ़ाओ ,खुदको नहीं हार को हराओ ,

ऐसा कोई जज्बा जगाओ , ख्वाब देखो और ख्वाब सजाओ ,

कुछ करने की ठानो, कभी हार मत मानो !

रुको नहीं , बस चलते जाओ ,

रुको नहीं ,बस चलते जाओ !!

पुनःश्च आपले आभार मानतो. पुढील काळात आपल्या सर्वांच्या ताकदीने, आशिर्वादाने व सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशाची असंख्य शिखरं गाठेल, असा विश्वास व्यक्त करतो.

जय भारत, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी!

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!