Share

‘अनिल देशमुख कुठे आहेत याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी’, दरेकरांनी विचारला जाब

Published On: 

मुंबई : गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील चौकशी सुरू केली. त्याअंतर्गत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवांना अटक केली आहे. मात्र अद्याप अनिल देशमुख यांची चौकशी झालेली नाही. ‘ईडी’ने त्यांना आत्तापर्यंत पाच वेळा समन्स बजावले. पण देशमुख एकदाही समोर आलेले नाहीयेत.

त्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘अनिल देशमुख हे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त कुठे बेपत्ता आहेत कळत नाही. ते मुंबई आहेत का कुठे हे कळत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्तांनी देशमुख कुठे आहेत हे सांगायला पाहिजे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे महित नसणे यावरून पोलिस खात्यात काय गोंधळ सुरू आहे हे दिसत आहे. देशमुख कुठे आहेत याची माहिती राष्ट्रवादीने द्यावी असे आवाहन दरेकर यांनी केले आहे.

दरम्यान, ईडीने वारंवार समन्स बजावूनही देशमुख गैरहजर आहेत. तसेच ते कुठे आहेत हे देखील माहिती नाहीये. त्यामुळे ईडीने त्यांना शोधण्यासाठी थेट सीबीआयची मदत मागितली आहे. अनेकदा नोटीस बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची भूमिका अनिल देशमुख यांनी घेतली आहे. यामुळे आता ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणा राज्यभरात ठिकठिकाणी देशमुखांना शोधण्यासाठी छापेमारी करण्याची शक्यता आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!