कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विधान परिषदेवरील निवडीवरुन राष्ट्रवादी आणि राजू शेट्टी यांच्यात वाद सुरु आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवू नये, अशी मागणी राष्ट्रवादीकडून वारंवार करण्यात येत होती. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांचा पत्ता कट होण्याच्या दाट शक्यता आहे. त्यावर राजू शेट्टींनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुनावलं आहे.
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देऊन राष्ट्रवादी काही मेहबानी करत नाही. आधीच या जागेबाबत समझोता झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वीच हा समझोता झाला होता. आता केलेला समझोता पाळायचा की पुन्हा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीनं ठरवायचं’, असे म्हणत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीला सुनावलं आहे.
‘आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार’, असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करा-पालकमंत्री
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासाठी थांबवू नका, ‘वंचित’ची भूमीका
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- अखेर तिसरी घंटा वाजणार; नाट्यगृहे खुली करण्यास ‘या’ तारखेपासून परवानगी
- राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान – सामंत

