टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेला सत्तासंघर्ष आज अखेर संपणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घघेणार आहेत. यासाठी राज्यातील आणि देशातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे.
मात्र विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीने विरोध केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऐवजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा आता विधानसभा अध्यक्षपदासाठी सुरु आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याबाबत फारसे अनुकूल नसल्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. परंतु अशोक चव्हाण विधानसभा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनुत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1199927932333903872?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199928266305392641?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

