Share

सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत ‘पीएसआर लेजिस्टेटिव्ह रिसर्च’ या संस्थेने केलेल्या पाहणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली असून त्या लोकसभेतील सर्वाधिक सक्रिय सभासद ठरल्या आहेत.

मे आणि डिसेंबर २०१९ मधील संसदीय अधिवेशनांमध्ये सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले तर विविध राष्ट्रीय विषयांवरिल ७५ चर्चांमध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना येथील जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न त्या नेहमीच हिरीरीने संसदेत मांडत असतात. खासगी विधेयके मांडण्यातही त्यांचा पुढाकार असतो. जनतेच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्यच असल्याची भावना याबाबत खा. सुळे यांनी नेहमीच व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘प्राईमटाईम फाउंडेशन’च्या वतीने देण्यात येणारा २०१८ सालचा ‘संसदरत्न’ पुरस्कार देखील सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला होता. चेन्नई येथील ‘आयआयटी’च्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते सुळे यांना गौरविण्यात आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!