Share

Supriya Sule : सुप्रिया सुळेंच चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण; म्हणाल्या,“लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुप्रिया सुळे यांनी खास आमंत्रण दिले आहे. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, तुमचा खास बेत करते” असे जेवणाचे खास आमंत्रण पाटलांना दिले आहे. कार्यक्रमादरम्यान राजकारणापेक्षा घरात लक्ष द्यावे या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना अनोख्या पद्धतीने जेवणाचे आमंत्रण दिले आहे. “मला घरातील काम किंवा स्वयंपाक करायला कधीही कमीपणा वाटत नाही, उलट मला जेवण बनवून खावू घालायला आवडतं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचं ते विधान मी फार मनावर घेत नाही” असेही सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी बऱ्याच मोठ्या नेत्यांशी अभासीतपणे चर्चा केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसेच एकनाथ शिंदे यांचेही फोटो दाखवण्यात आले होते. या नेत्यांसोबत आपण कशाप्रकारे बोलू किंवा कशाप्रकारे मत व्यक्त करू याबाबत सुप्रिया सुळे यांनी दाखवले. याचवेळी सुप्रिया सुळे यांना चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी “चंद्रकांतदादा लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटलांना जेवणाचे आमंत्रण दिले.

यावेळी सुळेंनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचत त्यांना सादही घातली आहे. “माझ्या मतदारसंघाचा खासदार निधी अडकला आहे. तुमचे आणि मोदीजींचे संबंध चांगले आहेत. तुम्ही त्यांना तो निधी द्यायला सांगा ना, खूप कामं रखडली आहेत”, अशाप्रकारे त्यांनी चंद्रकांत पाटलांचे कान टोचले. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा काढला होता यावेळी ते बोलताना म्हणाले होते की, सुप्रिया सुळे, तुम्ही घरी जाऊन स्वयंपाक करा, नाहीतर कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर नंतर राजकीय वातावरणात जोरदार वादही रंगला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!