Share

पूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होता – आव्हाड

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सांगली कोल्हापूरमध्ये आलेले पुराचे पाणी आता ओसरले आहे, मात्र दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या टीकेमुळे पुरावरील राजकारणाला ऊत आला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पूरग्रस्तांच्या मदतीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली होती, तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर राजकारण करण्याचे सदाभाऊ खोत काम करत आहेत. खोत यांनी महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे भान न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. पण पूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होता, असा खोचक सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष ८० वर्षांचा तरूण पुराची पाहणी करण्यात व्यस्त आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तब्येतीची पर्वा न करता पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे सदाभाऊंनी राजकारण न करता संकटग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला या पुराशी देणं घेणं नाही. त्यांना राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. हे काम राष्ट्रवादी मोठ्या तडफेन करत आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं कोरडी सहानुभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय ? ,पाण्यात उतरले असते तर स्वागत केलं असतं’ अशी घणाघाती टीकाही खोत यांनी केली होती.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी मावळ गोळीबाराचा उल्लेख करत. “शेतकऱ्यांचा इतकाच पुतळा असता तर मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला नसता. तेव्हा शेतकऱ्यांवरचं प्रेम कुठे गेलं होतं ?”, असा सवाल राष्ट्रवादीला विचारला आहे वर्ध्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मंत्री सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!