Share

#महापूर : ‘पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करा, अन्यथा गोदाम लुटू’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत. अशातच राज्य सरकारने पुरात अडकलेल्या लोकांसाठी अजब निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुराचं पाणी २ दिवस घरात असेल तरच गहू आणि तांदूळ मिळणार असल्याचा अजब निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. वेळीच पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करा. अन्यथा गोदाम लुटू असा इशारा दिला आहे. राज्यातील सरकारनं घर दोन दिवस पाण्यात बुडल्यास तरच मोफत अन्नधान्य 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देऊ असा जीआर काढला आहे. हा जीआर जनतेची म्हणजेचं’ पूरग्रस्तांची थट्टा करणारा आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान सरकारच्या या धक्कादायक मदतीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या पूरग्रस्त भागाला शासकीय मदत करण्यासाठी एक नियम आडवा येतोय. कुटुंबातील सर्व वस्तू वाहून गेल्या असूनही मदतीसाठी नियमात बसणं गरजेचं आहे. सलग दोन दिवस घरात पुराचं पाणी असेल, तरच शासकीय मदत मिळते असा नियम आहे. ही अट काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या काळात सात दिवसांची होती, जी दोन दिवसांवर आणली, अशी माहिती शेलार यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!