टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजप – शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे, खुद्द सोपल यांच्याकडून चर्चेला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र आता येत्या महिनाभरात शिवसेनेत प्रवेश करायचं कि नाही, हा निर्णय घेणार असल्याचं आ. दिलीप सोपल यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले आहे.
आजवर आपल्या राजकारणाची दिशा तालुक्यातील जनतेनेच ठरवली आहे, त्यामुळे दोन वेळ अपक्ष लढूनही विधानसभेला विजय मिळाला. सर्वच पक्षातून प्रवेशासाठी ऑफर आहेत, मात्र कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेतला जाईल, असं यावेळी सोपल यांनी सांगितले आहे. दरम्यान, आजची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाकडून न लढता अपक्ष लढलेले चांगल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांचे ‘वेट अँड वॉच’
राष्ट्रवादी काँगेसचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. बबन शिंदे, आ दिलीप सोपल यांच्यासह डझनभर नेते भाजप – शिवसेनेच्या वाटेवर आहेत, मात्र दोन्ही सत्ताधारी पक्षातील वातावरण पाहता युती होणार कि नाही याची शंका असल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
मी मैदान सोडून पळणार नाही : आमदार नितेश राणे
राधाकृष्ण विखे पाटलांनी योग्य मार्ग दाखवला, म्हणून मी भाजपात : पिचड
रोहित पवारांचं ठरलं…इच्छुक म्हणून ‘या’ मतदारसंघासाठी दिली मुलाखत
सोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची शक्यता?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

